मारवड महाविद्यालयात कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती साजरी.

अमळनेर:मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी तात्यासाहेब कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची १११ वी जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. वसंत देसले हे होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमीन पठाण हिने तर प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील यांनी तात्यासाहेब कुसुमाग्रजांच्या समग्र साहित्यावर भाष्य केले. प्रतिमा पूजनानंतर द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी कु. वैष्णवी महाजन हिने कुसुमाग्रजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ वसंत देसले यांनी, कुसुमाग्रजांच्या कविता व त्यातील जीवनाचे सार यावर उपस्थितांना उद्बोधन केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांनी केले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

याप्रसंगी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.

[democracy id="1"]