
अमळनेर:सर्वत्र राजकीय उदासीनता असताना आम आदमी पार्टी जनतेच्या पसंतीस उतरली असून राजकीय पोकळी भरून काढायला एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे लोकनेते जितेंद्र भावे यांनी केले.. ते अमळनेर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते..
नाशिकची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले तसेच वोकार्ड हॉस्पिटल अर्ध नग्न आंदोलन फेम, जितेंद्र भावे, व त्यांचे सहकारी यांनी अमळनेर येथे येऊन, आम आदमी पार्टीचे कामाची दखल घेत अधिक जोमाने कामास लागण्याचे आवाहन केले.
या बैठकीत तालुकाध्यक्ष संतोष पाटील, शिवाजी पाटील, धनंजय सोनार, प्रा. गणेश पवार, नाना पाटील, राजेंद्र पाटील, नारायण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.