नविन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली- रंजाणे ता.अमळनेर येथे इ.१०वीच्या विद्यार्थ्यांनाचा निरोप समारंभ संपन्न..

अमळनेर: नविन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली- रंजाणे ता.अमळनेर जिल्हा जळगांव येथे दि. २१/०२/२०२३रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमख पाहूणे श्री विजयसिंग पवार सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोकुळ आनंदा पाटील मा. केंद्रप्रमुख अंतुर्ली ता. अमळनेर,मा.शिक्षक बी एस पाटील,उपस्थित होते.यावेळी प्रथम उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब श्री गोकुळ पाटील यांना सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेकडून शाल ,टोपी,श्रीफळ आणि सफारी ड्रेस बुके देवून सत्कार केला.तसेच प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर .बी .पाटील यांनी केले.प्रास्ताविकात बोलतांना मुख्याध्यापक म्हणाले कि परीक्षा ही तणावविरहीत द्या. प्रश्नपत्रिका नीट वाचून उत्तरपत्रिका लिहा.सुरवंटापासून तुम्ही फुलपांखरू झालात.आपणास प्रेरणा देणाऱ्याचे स्वप्न पूर्ण करा परीक्षेस जातांना वेळे आधी जा.जीवनात १०वी १२वीचे टप्पे आहेत पूर्ण आयुष्य नव्हे.तुमच्या यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा.तुमची बॅच फारच गुणी व हुशार होती.आमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील.विद्यार्थी प्रतिनिधी मधून एक मुलगा एक मुलगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .आम्हाला सर व मॅडम यांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार विद्यार्थी केंद्रितअध्यापन केले.अध्ययन स्तरानुरूप गट पध्दतीने हसतखेळत अध्यापन केले आमचे हे सहा वर्षे ह्रदयात जपण्यासारखे गेले.
प्रमुख पाहुणे शिरसाळे माध्यमिक विद्यालयातील श्री विजयसिंह पाटील सर विद्याथ्यांना मार्गदर्शन करतांना बोलले की माझे विनामुल्य क्लासेस आहेत त्यात तुम्ही केव्हाही या मी तुम्हाला सदैव मार्गदर्शन करेल.तुम्हाला १० वी नंतर भरपूर मार्ग आहेत.तुमच्या आवडीनुसार क्षेत्राची निवड करा.काहीही बना पण त्या क्षेत्रातील आयडाल बना.या पाच सहा वर्षं अभ्यासाची मेहनत घ्यावी पंचावन्न वर्षाचे फिक्स डिपाॅझीट आहे.हा तुमचा टर्निंग पाॅईंट आहे. आईवडिलांना ,सरांना आनंद होईल असे कार्य करा.सरांनी म्हणावे आमचा शाळेचा आदर्श विद्यार्थी होता.गाव ,शाळा,समाज यांना गर्व होईल असे बना.हा सेल्फीचा जमाना आहे.आपल्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह इच्छा इतरांनी काढावी असे बना.उत्कृष्ट अधिकारी बना.व यशवंत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात आबासाहेब श्री गोकुळ पाटील मा. केंद्रप्रमुख यांनी सांगतले कि मी तुम्हाला निरोप नाही देणार मी तुमचे शुभचिंतन करण्यासाठी आलो.आजचा दिवस संमीश्र आहे.शाळा सोडल्याचे दुःख आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठीचा आनंद. हे सोळावे वरीस धोक्याचे नसून मोक्याचे आहे.आजची घेतलेली मेहनत उज्वल भविष्य निर्माण करेल.या काही काळ आपण अभ्यासात सातत्य ,चिकाटी,मेहनत, अभ्यासाचे योग्य नियोजन,अभ्यासाचे वेळापत्रक,अभ्यास करण्याची वेळ,सकारात्मक विचार,योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन,यशस्वी लोकांचे चरित्र वाचन,ध्येय निश्चित,प्रामाणिकपणा ,संयम विद्यार्थी काळात संधीचे सोने करा.अभ्यासात अर्जुनासारखी एकाग्रता,छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जबरदस्त आत्मविश्वास ,काळ आणि वेळ पाळा ह्या गुणांचे पालन करा तुमच्या स्वप्नांतील जीवन कोणीही राखू शकत नाही तुम्हाला जे बनायचे ते नक्की बनाल.यशस्वी व्यक्तींचा कोणाचातरी आदर्श ठेवून वाटचाल करा.भविष्याची गरज ओळखून अभ्यासाची दिशा ठरवा.परिस्थितीची जाणीव ठेवून परिस्थिती जर बदलवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.याचे ओझे होत नाही. चोरी होत नाही.आणि कोणचाही हिस्सा नसून शंभर टक्के आपणास मिळते.मोठी स्वप्न बघा 3 D आत्मसात करा.Do,Drem,Discoverतसेच 4-H सक्षम करा Head,Hart,Hand ,Health यावर सविस्तर मार्गदर्शन केले.यशवंत,गुणवंत,धनवंत,ज्ञानवंत आणि किर्तीवंत बना असे मार्गदर्शंक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सुभाष पाटील सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन विद्यालयातील भाऊसाहेब यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पी डी पाटील सर,बी एन पाटील सर,सौ. एम आर पाटील मॅडम,श्रीमती एस जी बैसाणे मॅडम , श्री जी बी पाटील सर,अजय पाटील सर्व शिक्षक बंधू ,भगिणी आणि शिक्षकेतर कर्मचारी नानाभाऊ ,संजय पाटील आणि भटू पाटील  यांनी प्रयत्न केले.

[democracy id="1"]