माजलेल्या मुख्याध्यापकाकडून मदतनीस महिलेचा विनयभंग
अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल…

अमळनेर : येथील पैलाढ भागातील राजश्री शाहू महाराज या शाळेतील नरेंद्र अहिरराव या माजलेल्या मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील मदतनीस असलेल्या एका महिलेचा विनयभंग केला असून त्याच्यावर आज अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर शहरातील पैलाड भागात असलेल्या राजश्री शाहू महाराज विद्यालयातील मुख्याध्यापक नरेंद्र अहिरराव याने आपल्याच शाळेतील एका मदतनीस असलेल्या महिलेचा विनयभंग केला आहे. पिढीत महिला हि राजश्री शाहू विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेत मदतनीस म्हणून १० वर्षांपासून कार्यरत आहे. माजलेला मुख्याध्यापक अहिरराव हा अनेक वर्षांपासून महिलांची पिळवणूक करीत मुख्याध्यापक पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप संबंधित पिढीत महिला व संस्थेच्या पदाधिकारी यांनी केला आहे. दिनांक १५ रोजी पिडीत महिला व तिच्या सोबत काम करीत असलेल्या इतर महिलांना मुख्याध्यापक अहिरराव याने जातीवाचक शिवीगाळ करीत त्यांना स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीची वागणूक दिली होती. त्या महिला त्याच दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यसाठी गेल्या होत्या. मात्र त्या वेळी शाळेचे चेअरमन व इतर लोकांनी त्यांची समजूत काढून त्यांना गुन्हा न दाखल करण्याची विनंती केली होती. त्या नुसार त्यांनी माघार देखील घेतली. मात्र आज पुन्हा त्या मुजोर मुख्याध्यापकाने स्वयंपाकी व मदतनीस यांना गलिच्छ व अश्लील अशी शिवीगाळ करत मारहाण केली तर या बाबत विचारणा करणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्ष यांना देखील त्या मुख्याध्यापकाने कानशिलात वाजवली आहे. तर एका महिलेची साडी ओढून तिला बाहेर ओढत तिचा विनयभंग केला आहे. तर या बाबत अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३५४ अ , २९४, ३२३, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

[democracy id="1"]