शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळताच अमळनेरात जल्लोष

अमळनेर:केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह ना.एकनाथ शिंदे गटाला देण्यात आल्याचे वृत्त येताच अमळनेरात शिवसैनिकांनी रेस्ट हाऊस जवळ व पैलाड नाकयावर फटाकयांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला.
सत्य परेशान हो सकता है,पराजित नही .अशी प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी यावेळी दिली.छत्रपती शिवाजी महाराज की जय,सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो.एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है.अश्या घोषणांनी सर्व परिसर दणानून गेला होता.यावेळी शहरप्रमुख व माजी नगरसेवक संजय पाटील(भूत बापू),विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, उपशहरप्रमुख प्रवीण पाटील, शहरसंघटक साखरलाल माळी सर,युवा तालुका प्रमुख गुणवंत पाटील, शहरप्रमुख भरत पवार, युवा सेनेचे उपशहरप्रमुख विजय सळूंखे, भोला टेलर ,टीनू बोरसे,गणेश पाटील, सुनील देवरे,नरेंद्र पाटील, राजू पाटील, चेतन देवरे,विजय पाटील, मनोज देवरे, जिजाबराव पाटील, उमाकांत चव्हाण, शोएब शेख,किरण पाटील , कुणाल चौधरी, गणेश पाटील आदि शिवसैनिक उपस्थित होते.

[democracy id="1"]