अमळनेर येथील पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी जाहीर.

अमळनेर : येथील पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आधी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश जग्यानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.आता एकूण १५ सदस्यांची कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली असून नवनिर्वाचित कार्यकारीणीत पुढील समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष संजयकुमार बितराई,सेक्रेटरी म्हणून हरेशलाल शामनानी,
गोरधनदास डावरानी,खजिनदार गुरूनामल बठेजा,जितेंद्रकुमार डिंगराई,धर्मशाळा इंचार्ज राजकुमार हिंदुजा,लक्ष्मणदास बजाज,जेष्ठ सल्लागार तोलाराम पंजवाणी,मुकेशभाई ठाराणी,कार्यकारिणी सदस्य भरतकुमार कालानी,घनश्यामदास थदानी,जेठानंद तोलाणी,महेशलाल डिंगराई,महेशकुमार मकडीया
     नवनिर्वाचित कार्यकारीणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूज्य सिंधी जनरल पंचायतीच्या वतीने महाशिवरात्र व शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत