जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे थाटात भूमिपूजन.

आ.अनिल पाटलांनी दिली भरीव कामे,ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत

अमळनेर: तालुक्यातील जळोद येथे ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे भूमिपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी आ.अनिल पाटलांनी भरीव विकासकामे दिली म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
सत्कार समारंभानंतर आमदारांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावातील सरपंच आणि सदस्यांच्या कामकाजाचे कौतुक करून जळोद गावाने नेहमीच आपल्याला प्रेम दिले असल्याने प्रेमाची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून होत राहील अशी ग्वाही दिली.यावेळी सरपंच भारती शशिकांत साळुंखे,शशिकांत साळुंखे, संभाजी देशमुख, हरीश कोळी ज्ञानेश्वर चौधरी,दीपक साळुंखे, कल्पेश देशमुख,अनिल साळुंखे, प्रकाश चौधरी, निलेश चौधरी, रघुनाथ धनगर, मयुरी बाविस्कर, बापूराव कोळी, सुनील देशमुख, भिकाजी पाटील, सुरेश देशमुख, अशोक शिरसाठ, जवाहरलाल भोई, हिम्मत भोई,रघुनाथ चौधरी, किरण पाटील,धनंजय पाटील, योगेश साळुंखे,प्रवीण शिरसाठ,नागो कोळी, सुरेश चौधरी,केदार चौधरी, योगेश शेटे, कमलाकर पाटील,सुनील चौधरी,रोहिदास भोई,सुधाकर पाटील,भिकाजी पाटील,भास्कर कोळी,बाबूलाल कोळी, काशिनाथ कोळी, छगन चौधरी, जितेंद्र साळुंखे,भानुदास चौधरी, सुरेश वैदू, प्रमोद साळुंखे, विलास सोनवणे,अक्षय शिरसाठ, गोलू देशमुख,प्रथमेश पाटील,सुनील साळुंखे ,रवींद्र कोळी,भटू चौधरी, सतीलाल भोई, संजय धोबी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांचे झाले भूमिपूजन,,,

डी.पी.डी.सी. अंतर्गत मराठी शाळेला वॉलकंपाउंड करणे 10.लक्ष, 2515 अंतर्गत सभामंडप बांधणे 15.लक्ष,
डी.पी.डी.सी.अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 22.लक्ष, डी.पी.डी.सी.अंतर्गत स्मशानभूमी बांधणे 10 लक्ष.

[democracy id="1"]