राष्ट्रीय विकास प्रबोधन अभियान अंतर्गत डी.आर.कन्याशाळेत कार्यक्रम सम्पन्न.

अमळनेर: दि.१५ फेब्रुवारी रोजी युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे,राष्ट्रीय विकास प्रबोधन अभियान अंतर्गत अमळनेर शहर व तालुक्यात शिवजयंती पंधरवाडा आयोजित केला असून त्याअंतर्गत पंधरा दिवस विद्यार्थ्यांसमोर शिवाजी महाराजांचे कर्तृत्व बाल वक्ते मांडणार आहेत. श्रीमती द्रौ रा कन्याशाळेत बोहरा सेंट्रल स्कुल ची शैलजीत शिंदे, डी आर कन्या शाळेची भविका वाल्हे, जी एस हायस्कुल चा साई पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार सांगितले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा सूर्यवंशी, प्रा.डॉ. लीलाधर पाटील,बापूराव ठाकरे, प्रा.अशोक पवार उपस्थित होते. शाळेत सकाळ व दुपार दोन्ही सत्रात कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी सुत्रसंचलन श्रीमती वाय.एम.पाटील व दिनेश पालवे यांनी केले. आगामी काळात विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या दिवशी पेन,संगणक व शिव प्रतिमा यांच्या पूजनाचा संकल्प केला आहे. सुत्रसंचलन श्रीमती वाय.एम.पाटील व दिनेश पालवे यांनी केले. तर आभार श्रीमती आर. एस.सोनवणे व प्रतिभा साबे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले.