अखेर दगडी दरवाज्यावर मांगीर बाबांची मूर्ती बसणार
मा. आमदार कृषिभूषण पाटील व समाजाच्या प्रयत्नांना यश..

अमळनेर : गेल्या काही वर्षांपूर्वी अमळनेर येथील वेस दगडी दरवाज्याचा बुरुज ढासळला होता. या दरवाज्यावर मातंग समाजाचे आराध्य दैवत मांगिर बाबा यांची मूर्ती देखील होती. म्हणून महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेअंतर्गत अमळनेर नगर परिषदेकडे देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांरीत करावा अशी मागणी करण्यात आली होती. तत्कालीन नगराध्यक्ष कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी हि मागणी केली होती. तर सन २०२० साली हे काम नगर परिषदेकडे हस्तांतरित करून त्या बुरुजाचे काम सुरु करण्यात आले होते. तर दरवाज्यावर असलेली मांगीर बाबांची मूर्ती नवीन बनविण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांनी समाजाच्या कार्यकर्त्यांना बोलावून ४५ हजार रुपये रोख दिले होते त्यानुसार मूर्ती देखील तयार करण्यात आली होती. परंतु मूर्ती बसवण्याच्या वेळेस पुरातत्व विभागाने कळवले कि, संबंधित ठिकाणी मंगीर बाबा यांची मूर्ती असल्याचा काहीही पुरावा नाही. म्हणून या बाबत समाजातील कार्यकर्ते यांनी नगर परिषद अमळनेर , तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, व विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांना वेळोवेळी निवेदने दिली. म्हणून समाजाचा तसेच नगर परिषद व इतर लोकांचा ठोस पाठपुराव्याने दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पुरातत्व विभागाने दगडी दरवाज्यावर होती त्याच ठिकाणी मूर्ती बसवण्यास परवानगी दिली आहे. म्हणून आता नगर परिषदेने होती त्या परिस्थिती मूर्तीची प्रांप्रतिष्ट करून स्थापना करून द्यावी अशी अपेक्षा समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

यासाठी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, सल्लागार हरिचंद्र कढरे, शहराध्यक्ष जितु कढरे, कांतीलाल गरुड, नारायण गांगुर्डे, राहुल गरुड, दीपक गरुड, लखन चंदनशिव, प्रवीण शिरसाठ, सागर अवचिते, अनिल गरुड, दीपक चंदनशिव, विजू मोरे, अशोक गरुड, दसरथ विसावे, दीपक कांबळे, राहुल गरुड, बाळा चंदनशिव, विजय शिरसाठ आदींनी अथक प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश आल्याने समाजात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वेळोवेळी या विषयात समाजाला सहकार्य करणारे माजी आमदार साहेबराव पती व तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे समाजाने आभार मानले आहेत.
दरम्यान लवकरच मांगिर बाबांची मूर्ती अमळनेरात आणली जाणार असून त्या मूर्तीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार असल्याचे समजते.

[democracy id="1"]