एरंडोल प्रतिनिधी (प्रमोद चौधरी ) : राजापूर येथील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे १३फेब्रुवारी २०२३ रोजी तिव्र निषेध करण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
अगोदर संघाच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली.या सभेचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील हे होते.
यावेळी संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी,किशोर मोराणकर,प्रविण महाजन,प्रमोद चौधरी आदी पञकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नंतर एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील,तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी,कार्याध्यक्ष शैलेश चौधरी,कैलास महाजन,कासोदा येथील पञकार अब्दुल हक अब्दुल देशमुख,रोहीदास पाटील,चंद्रभान पाटील,प्रविण महाजन,नितिन ठक्कर,राजधर महाजन,संजय बागड,किशोर मोराणकर,पंकज महाजन,उमेश महाजन,नितिन पाटील,देविदास सोनवणे, प्रल्हाद पाटील,प्रमोद चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात सदरील प्रकार हा घातपाताचा असुन संशयीत आरोपी पंढरीनाथ आंबेकर याच्या विरोधात बातमी दिल्याने दुखावल्यामुळे हा अपघात नसुन आंबेकर यानेच हा घातपात घडवुन आणला आहे असा आरोप करण्यात आला असुन आम्ही या घटनेचा तिव्र निषेध करीत अाहोत तसेच पञकार संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी व वारीशे यांच्या कुटुंबियांना तसेच राज्यभरातील पञकारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.