संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनाला भाविकांची गर्दी….

अमळनेर: संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात अमळनेर तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती….
सकाळी मंदिरात महाआरती, अभिषेक, लघु रुद्राभिषेक व महिला वारी प्रमुख ज्योती पवार व सर्व गजानन परिवारातील महिलांनी गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचे वाचन केले.. तालुक्यातील अनेक महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिरात सत्संग करण्यात आले. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने ज्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्यांचा मंदिरात गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष
प्रा आर बी पवार,सौ ज्योती पवार यांनी सत्कार केला व ज्यांनी ज्यांनी गजानन महाराजांची मनोभावे सेवा केली त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले…
दुपारी संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात तालुक्यातील अनेक गजानन भक्त परिवाराने येथेच्छ आनंद घेतला.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश सोनार,नितीन भावे,अशोक भावे, जयवंत पाटील आनंद पाटील, मोहित पवार, परेश पाटील, चेतन उपासनी ,प्रवीण पवार श्रीकृष्ण चव्हाण ,रघुनाथ पाटील, गुलाब पाटील ,विश्वास पाटील ,एल.जे चौधरी, पंकज वाणी ,विजय वाणी, अनिल पाटील, संजय पाटकरी, संदीप पाटील, सिद्धांत पाटील , ज्योतीताई पवार ,सुनिता खोंडे ,शोभा कोळी, वंदना भारती, बबीता पवार, इंदिरा येवले ,कविता येवले,सुनिता पाटील, संगिता पाटील, गजानन परिवारातील बंधू व भगिनी यांनी प्रयत्न केले.

[democracy id="1"]