नाचू किर्तनाचे रंगी;शहापूरला परिवर्तनवादी किर्तनातून जनजागृती

अमळनेर: संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करत जनजागृती करण्याचे महान काम केलेले आहे. महाराष्ट्र ही संत महापुरुषांची भूमी आहे. महाराष्ट्रात कीर्तन हा जनमानसात लोकप्रिय आहे. प्रा. नानासो.शिवाजीराव पाटील, गांधली ता.अमळनेर यांच्या स्वरचित निर्भगावलीतील क्रमांक १३६५ व्या निर्भंगावर ह.भ.प .भगवानदास घुगे ( शास्त्री महाराज ) नगरकर यांनी शहापूर ता. अमळनेर येथे दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी जनजागृती केली. किर्तनाचे आयोजन राजू महाराज यांनी केलेले होते.
प्रा. शिवाजीराव पाटील हे राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.त्यांनी राष्ट्रसंत जगद्गुरु विश्ववंदनीय तुकोबाराय यांना प्रेरणास्थानी ठेवून आज रोजीच्या वास्तवतेस अनुसरून समाज प्रबोधनात्मक तीन हजार
निर्भगांची रचना केलेली आहे.
त्यांच्या स्वरचित निर्भंगावलीतील निर्भंग क्रमांक 1365 व्या निर्भंगावर हभप भगवानदास घुगे शास्त्री महाराज नगरकर यांनी शहापूर येथे समाज प्रबोधनात्मक किर्तन घेऊन समाज जागृती केली.
याप्रसंगी
निर्भगावलीकार शिवाजीराव पाटील,आर.बी. पाटील, योगेश्वर पाटील ढेकूसिम ,रमेश पाटील गडखांब, पत्रकार अजय भामरे, उपसंपादक सोपान भवरे, वसंत महाराज, भाऊसाहेब दशरथ पाटील, हार्मोनियम वादक वसंत महाराज आदि उपस्थित होते तसेच शहापूर गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किर्तन समाप्तीअंती अशा प्रबोधनात्मक कीर्तनांची हल्लीच्या काळात गरज आहे ,अशी जनमानसात चर्चा होत आहे.

[democracy id="1"]