१० वर्षापासुन गुन्हयातील फरार आरोपीला अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेश मधून केले अटक.

अमळनेर: १० वर्षापासुन गुन्हयातील पाहीजे आरोपी हा फरार झाला होता. त्याचा मध्यप्रदेश राज्यात शोध घेवुन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून अटक केले . सविस्तर माहिती अशी की, अमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन २०१/२०१३ भादवि कलम ३२४ वगैरे प्रमाणे गुन्हा दिनांक १०/११/२०१३ रोजी दाखल होता. सदर गुन्हयातील फिर्यादी मनोज देविदास पाटील वय २३
वर्षे रा. जुने बस स्थानक अमळनेर यानां आरोपी कालु उर्फ विशाल दुर्गादास जाधव रा. गांधलीपुरा अमळनेर यास फिर्यादी हे नाचत असतानां त्यास धक्का लागल्याने आरोपीताने फिर्यादीस तोंडावर ठोसा मारुन त्याचे हातातील वस्ताराने गळ्यास कंठाजवळ व पायाच्या मांडीवर मारुन दुखापती केले होते. व सदरचा आरोपी हा आतापावेतो फरार होता. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करुन मा. न्यायलयात आरोपीताविरुध्ध दोषारोप पत्र दाखल होते.
नमुद आरोपी हा गुन्हा केले नंतर अमळनेर शहरातुन निघुन गेला होता. सन २०१३ पासुन आतापावेतो फरार होता. मा. न्यायालयाने त्याचे स्थायी वांरट देखील काढले होते. या पूर्वी देखील पाहीजे आरोपीताचा शोध घेणे कामी मा पोलीस अधिक्षक सो, याचे आदेशान्वये वेळोवेळी पोस्टे अभिलेखावरील पाहीजे आरोपीताचा शोध घेणेकामी तपास पथके पाठविण्यात आली होती परंतु तो
मिळुन येत नव्हता.
दिनांक १०/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यानां मिळालेल्या गोपणीय बातमी नुसार सदरचा आरोपी हा त्याचे नाव बदलुन इंदोर शहरात राहत असल्याची माहीती मिळालेवरुन
त्यानों पोउपनि अनिल भुसारे व त्याचे सोबत चे पोना मिलींद भामरे, पोना. सुर्यकांत साळुखे अशाना योग्य त्या सुचना देवुन रवाना केले होते. त्या प्रमाणे आरोपी कालु उर्फ विशाल दुर्गादास जाधव याचा ठावठिकाणा बाबत कोणतीही माहीती नसतानां इंदोर शहरात त्याचा शोध घेत असतानां नमुद पोलीस पथकास तो दिनांक ११/०२/२०२३ रोजीचे रात्री दिसुन आल्याने तो पोलीसानां पाहुन पळु लागला असता त्यास पथकातील अधिकारी व अमंलदार यानीं चतुराईने पकडुन अमळनेर पोलीस स्टेशनला हजर केले असुन नमुद आरोपीतास गुन्हयात अटक करण्यात आली आहे.