श्रीमती द्रौ. रा. कन्याशाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना निरोप..

अमळनेर दि ११फेब्रुवारी: श्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना निरोप देण्यात आला. त्यावेळी शालेय विद्यार्थीनिंनी पारंपरिक साडी परिधानकरून आपल्या शाळेचा शेवटचा दिवस साजरा केला. त्यावेळी शाळेचे चेअरमन श्री प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापिका सौ सीमा सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री बी एस पाटील,पर्यवेक्षक श्री व्ही के वानखेडे,श्री.व्ही.एम.कदम, जेष्ठ शिक्षक श्री.के.एस.मोरे,श्री.एस. एस.माळी यांनी शुभेच्छा दिल्या .शाळेच्या विद्यार्थीनी संचिता सूर्यवंशी,अदिती साळुंके, अश्विनी रधंवे,नेहा पाटील, प्रेमल माळी,प्राची मोरे, कृतज्ञा धनगर यांनी शाळेच्या आठवणी सांगितल्या.कार्यक्रम यशस्वीततेसाठी शाळेचे सर्व शिक्षक -शिक्षेत्तर कर्मचारी बंधू-भगिनिंनी परिश्रम घेतले. शेवटी पोहे व सोनपापडी वाटप करण्यात आले. फलक लेखन श्री डी एन पालवे यांनी केले.सूत्रसंचालन सौ.पी. पी.जोशी तर आभार सौ.एस.बी. उपासनी यांनी मानले.

[democracy id="1"]