माजी मंत्री छगनराव भुजबळ यांची अमळनेर येथील समता परिषदेचे भीमराव महाजन यांच्या घरी सदिच्छा भेट ..

अमळनेर : माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी आज ता.10 रोजी दुपारी 1 वाजता अचानक अमळनेर येथील समता परिषदेचे भीमराव महाजन यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

कुठल्याही संघटनेत, पक्षात काम करताना त्यात प्रत्येक कार्यकर्ता हा त्या पक्षाचा, संघटनेचा नेत्याला आपल्या जवळचा व्यक्ती म्हणून नेहमी आदर्श मानतो. त्यातच त्यांनी त्याला खरोखर आपला कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर त्याला न्याय दिला तर तो अधिक जोमाने काम करतो. असाच काहीसा प्रत्यय अमळनेर येथील समता परिषदेचा कार्यकर्ते भीमराव महाजन यांच्या बाबतीत घडले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तथा समता परिषदेचे अध्यक्ष छगनराव भुजबळ हे धरणगांव येथे माजी आमदार कै.हरीभाऊ महाजन यांच्या मुलाच्या लग्नाला आले असता तेथील विवाहभेट घेऊन परत जाताना त्यांनी अमळनेर येथील समता परिषदेचे प्रामाणिक कार्यकर्ते भीमराव महाजन यांना अचानक सदिच्छा भेट दिल्याने अमळनेर तालुक्यात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याप्रसंगी भीमराव महाजन यांच्या कुटुंबीयांची भेट घेत चर्चा करीत त्यांनी आपल्या कार्यकर्ता भीमराव महाजन यांच्याकडे स्नेह भोजनही केले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, माळी समाज बांधव यांनी प्रामाणिक कार्यकर्ता आणि नेता यांच्यातील प्रेम पाहून उपस्थितांचे मने जिंकली होती.
यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन,धुळे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष राजेश बागुल, माजी उपनगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन,माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, भाजपाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, प्रा. प्रकाश महाजन, योगेश महाजन सर ,कैलास महाजन, समाजसेवक बापू पाटील, मनोहर महाजन, गुलाब महाजन,सेवा मंडळचे अध्यक्ष गणेश महाजन, रवींद्र महाजन, रमेश महाजन, संदीप महाजन, प्रा. नितीन चव्हाण, माळी महासंघाचे पारोळा तालुकाध्यक्ष वना महाजन, माळी महासंघांचे माजी युवक जिल्हा अध्यक्ष प्रा. हिरालाल पाटील,भूषण महाजन,प्रितेश सोनार, अतुल दिगंबर महाजन, देविदास चौधरी,अरुण चौधरी, प्रवीण महाजन, मंगेश महाजन, पवन महाजन आदी उपस्थित होते.

[democracy id="1"]