हातेड येथे मोफत भव्य मोतीबिंदू तपासणी, रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन..!

स्वर्गीय सौ पुष्पलता दिलीपराव सोनवणे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर


हातेड ता. चोपडा (योगेश पाने )- येथील माजी आमदार तात्यासाहेब दिलीपराव सोनवणे यांच्या स्वर्गीय धर्मपत्नी सौ पुष्पलता दिलीपराव सोनवणे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 12 फेब्रुवारी २०२३ वार रविवार रोजी भव्य आरोग्य तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबिर हे प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे नियोजन प्रगती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, हातेड, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव, प्रगती महिला मंडळ हातेड, शिवशंकर ज्येष्ठ नागरिक संघ, तसेच श्री गुलाबराव देवकर मल्टी स्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे. नेत्र व मोतीबिंदू तपासणी, थायरॉईडची तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, बालरोग, मधुमेह, संपूर्ण रक्तातील चरबीचे प्रमाण, संपूर्ण स्त्रीरोग तपासणी, हाडांचे विकार, नाक, कान,घसा तपासणी करण्यात येणार असून गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा.
या शिबिरात रुग्णांना नाशिक जळगाव येथील अनुभवी तसेच तज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. तसेच रुग्णांना मोफत औषधी देखील वाटप करण्यात येणार आहे असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे. तरी गरजू रुग्णांनी सकाळी नऊ वाजेपासून या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा.