रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या प्रकरणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर निवेदन व काळ्याफिती लावून व्यक्त केला निषेध….

अमळनेर ( हितेंद्र बडगुजर)दि. १०/०२/२०२३: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांत खुपच वाढ झाली आहे. यासंदर्भात पुर्ण राज्यभर शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत आहेत.,पत्रकार बांधवांच्या संतप्त भावना आपण लक्षात घ्याव्यात. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने अमळनेरला तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले
पुरोगामी राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.तसेच पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करावी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे.. याकडे सरकारचे लक्ष वेधत आहोत. शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करत आहोत. आपण सदर निवेदनाची गांभिर्याने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन, मा. अमळनेर अध्यक्ष संजय सूर्यवंशी,पत्रकार महेंद्र रामेशे, यदुवीर पाटील ,हितेंद्र बडगुजर, योगेश पाने नूरखान पठाण, सुरेश कांबळे, सचिन चव्हाण, समाधान मैराळे, अजय भामरे, उमेश काटे ,जयेशकुमार काटेसह आता पत्रकारांच्या सह्या आहेत.

[democracy id="1"]