झाडी येथील उदय माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात केले साजरी…

प्रबोधनाचे संदेश देत विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने………

झाडी येथील उदय माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन धनगर दला पाटील,संतोष आबा,मोगल बा,दिलीप पाटील,नितीन पाटील, भैय्या पाटील, शिवाजी माधवराव पाटील,लोटन आनंदा पाटील, मुख्याध्यापक एम.के.पाटील सर, व गावातील सर्व माता,पिता,बंधू,भगीनी व समस्त ग्रामस्थ झाडीकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून व हवेत फुगे(बलून)सोडून अध्यक्ष व संचालक मंडळाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले.व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य,नाटीका व वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एम के पाटील सर यांनी तर सूत्रसंचालन इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी पूर्वा विजय पाटील व नम्रता किशोर पाटील यांनी केले.
तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापक एम.के.पाटील सर,श्री.जे.व्ही.महाले सर,हर्षा पाटील,व्ही.एस.पावरा,आर.एम.शिरसाठ,वैभव बागूल,मिलिंद पाटील,सुभाष आबा,अवचित नाना,मयूर पाटील आदी ची ही साथ लाभली व स्नेहसंमेलन उत्साहात साजरी करण्यात आले.

[democracy id="1"]