मुक्ताईनगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केले प्रकरणी एकावर गुन्हा दाखल तर काही काळ शहरात तणावाचे वातावरण.

मुक्ताईनगर : शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात असलेल्या शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे असून त्या ठिकाणी दि ०९/०२/२०२३ रोजी दु.४ : ३० वाजेच्या दरम्यान एका माथेफिरू समाज कंटकाने महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु सामाजिक कार्यकर्ते व पोलिस प्रशासन यांच्या मध्यस्थीने सदर वातावरण निवळले असून एका ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान , पुतळ्याची विटंबना झाल्याची वार्ता समजता बरोबर मोठा जमाव प्रवर्तन चौकात जमून काही काळ तणावाचे वातावरण होते. माथे फिरू त्या ठिकाणी असलेले झेंडे काढून महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करीत असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नी माथे फिरू ला चाबूतर्या वरून खाली उतरविले . व जमावाने त्याची धुलाई केली . व पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी स्टेशन च्या आवारातही फुले शाहू आंबेडकर प्रेमी समाज बांधवांचा मोठा जमाव जमला होता . व माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी आक्रमक पवित्रा घेत समाज कंटकावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली . गोकुळ भावराव बोदडे वय ३१ वर्ष यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत भगवान पाटील वय ३३ वर्षे रा. सालबर्डी याचेवर भांदवी कलम 294 व 295 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आलेला असून तपास पोलीस नाईक उमेश महाजन हे करीत आहेत.

[democracy id="1"]