सहाय्यक अधीक्षक, कौटूंबीक न्यायालय,जळगाव यांस 200 रु.लाच घेताना लाचलुचपत विभागाने केली अटक..

दि.०२/०२/२०२३रोजी हेमंत दत्तात्रय बडगुजर, वय-५७, सहाय्यक अधीक्षक, कौटूंबीक न्यायालय, बी.जे.मार्केट,जळगाव (वर्ग-३)
रा.इंद्रप्रस्थ नगर, शिवाजी नगर,जळगाव ता.जि .जळगाव यांना २०० रू.ची स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचेचे कारण
जळगाव येथील तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यामध्ये कौटूंबीक वाद होते म्हणून तक्रारदार यांनी पत्नी विरुद्ध कौंटुंबीक न्यायालय,बी.जे मार्केट जळगाव येथे पत्नीने त्यांच्याकडे नांदावयास यावे म्हणून दावा दाखल केला आहे व पत्नीने देखील तक्रारदार यांचे विरुद्ध त्याच कौटुंबीक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. सदर दाव्यात कौटुंबीक न्यायलयाने तक्रारदार यांना ८५,०००/-रुपये एकरकमी खावटी रक्कम देण्याचा आदेश दिला असुन सदर खावटीची एकरकमी रक्कम जमा करणेकरीता तारीख वाढवून मिळवून देण्याच्या मोबदल्यात यातील तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे यांनी २००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केलेली रक्कम जळगाव बी.जे.मार्केट जळगाव येथील कौटुंबीक न्यायालयाच्या वरच्या माळ्यावरील गोविंदा कॅन्टीनजवळ पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कारवाई हि सापळा पर्यवेक्षण अधिकारी- श्री शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. जळगांव.
सापळा व तपास अधिकारी- श्री.संजोग बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि.जळगांव.
सहसापळा अधिकारी व पथक- PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे.व सोबत
कारवाई मदत पथक- स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ .सचिन चाटे,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.आदिनी सदर कारवाई मार्गदर्शक- मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री.नरेंद्र पवार, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी कारवाई करण्यात आली.


[democracy id="1"]