सुदर्शन मित्र मंडळ व सचिन भाऊ खंडारे मित्रपरिवार यांच्या अभिनव उपक्रम…
अमळनेर: नैसर्गिक उपचार पद्धतीनुसार ॲक्युप्रेशर, सुजोक थेरपी या उपचार पद्धतीनुसार भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अमळनेर येथील सुदर्शन मित्र मंडळ व सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे मित्रपरिवार यांच्या अथक प्रयत्नाने शहरात 24 जानेवारी 2023 ते 30 जानेवारी 2023 रोजी दरम्यान श्री. गजानन महाराज मंदिर दुर्गा हॉस्पिटल समोर या भव्य अश्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात राजस्थान येथील डॉ.राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थान, उपचार रिसर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्था (रजि) हनुमानगढ, राजस्थान येथील ॲक्युप्रेशर थेरपिस्ट महेंद्र पितानी(D.A.in Acu),तसेच थेरेपिस्ट एम.आर.डाऊकिया(D.A.T.in Acu), व सहकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रुग्णांना बरे करून सेवा करण्यात आले होती.
ॲक्युप्रेशर ही एक नैसर्गिक उपचार पध्दती आहे. ॲक्युप्रेशर पॉइंट हाताच्या व पायाच्या तळव्यावर असतात. जेव्हा आपल्या कोणत्याही अवयवाला आजारपण येते तेव्हा हे पॉईंट बिघडलेले असतात. या पॉइंटला अॅक्युप्रेशर, सुजोक थेरपी या उपचाराच्या पध्दतीने प्रकृती हळूहळू सुधारून आजार बिना औषधाने बरा होतो. तसेच रक्तप्रवाह सुरळीत होवून रोगप्रतिकार शक्ती वाढते व रुग्णास बरे वाटू लागते. सर्व | वयोगटातील स्त्री पुरुषांचे खालील आजारांवर नैसर्गिक पध्दतीने उपचार करण्यात आले होते. शिबिराला अमळनेर शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व समाजातील सुमारे 250 हून अधिक रुग्णांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. या शिबिरात
नैसर्गिक उपचार,मणक्याचा आजार,सांधेदुखी,पाठीचा त्रास,डोकेदुखी,हातापायाला मुंग्या,थायराईड,मानदुखी,कंबरदुखी,अतीसार,पोटाच विकार,ब्लड प्रेशर,चिकन गुनिया,लडपणा,झोपेत लघवी होणे,
मधुमेह,एलर्जी,
दमा,पॅरालिसीस,
झोप न लागणे,सायटिका,गॅस, अपचन,
पोटरीमधील नस आखडणे,
नाक, कान, घसा यांचे आजार आशा अनेक आजारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्यात आले होते. या शिबिरासाठी सुदर्शन मित्र मंडळ व सचिन भाऊ खंडारे मित्रपरिवार यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे, डॉ.मुकुंद पवार, विजय पाटील, माधवरावं पाटील,आण्णा परदेशी,नाना सोनवणे, ईश्वर देशमुख, लोटन पाटील,व्ही डी पाटील, उमेश पाटील, भीमराव संदनशिव, दिपक चौधरी,रोहित देशमुख सौरभ पाटील, गीतेश देशमुख, धीरज पाटील यांनी विशेष परिश्रम घेण्यात आले होते.