धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी अमळनेर तहसीलदारांना निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंमळनेर -आरक्षणाच्या अंमलबजावणीसह संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायद्याची मागणी
अमळनेर : सकल धनगर समाज अमळनेरच्या वतीने धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार उमाताई ढेकळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. उत्तर महाराष्ट्र ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्लीचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने पूर्ण ताकदीने कायदेशीर लढा द्यावा, तसेच सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करून अनुभवी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळात २१ सदस्य असावेत. तसेच अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीस देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा यांचे नाव देण्यात यावे, तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करण्यात यावे, या मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
यावेळी नितीन निळे, मच्छिंद्र लांडगे, एस. सी. तेले, हरचंद लांडगे, रमेश शिरसाठ, दिलीप खांडेकर, चंद्रकांत कंखरे, प्रदीप कंखरे, चेतन देवरे, विलास कंखरे, शरद धनगर कवी, अनिल धनगर, सौरव भागवत, भाऊलाल पाटील, निखिल धनगर, अर्जुन भागवत, संदीप पाटील, देविदास पाटील, संदीप धनगर यांच्यासह सकल धनगर समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें