मतदान यादी अद्ययावत करणेकामी आढावा बैठक संपन्न.

अमळनेर: अमळनेर विधानसभा मतदारसंघ मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची निवडणूक विषयक आढावा बैठक ग.स हायस्कूलमध्ये संपन्न झाली.
सदर बैठक मा.उपविभागीय अमळनेर भाग अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
येणा-या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढावी ह्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.
यात मयत मतदार,दुबार मतदार, स्थलांतरित मतदार शोधून काढणे व ती नावे तात्काळ कमी करणे तसेच युवा मतदारांची नविन नावे सामाविष्ट करणे ह्या बाबत सविस्तर चर्चा करून योग्य अशी मार्गदर्शनपर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अमळनेर प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे साहेब यांनी दिली.
१ जानेवारी ते १ एप्रिल ,१ एप्रिल ते १ जुलै अर्हता दिनांक असून ३१ मार्च पूर्वी आधार लिंक करणे तसेच मयत मतदार शोधणे, वयाची ८० वर्षे पार केलेले ( वयोवृद्ध) मतदार शोधणे व ते व्हेरीफाय करून मतदान यादी अद्ययावत करणे,DSE, PSE, पुरूष स्री मतदार वाढविणे तसेच मतदार यादीत अस्पष्ट असलेली छायाचित्रे स्पष्ट करणे.
मयत व्यक्तींची नावे कमी नसतील तर ती कमी करावी ,ही नावे कमी नसल्यामुळे आजपर्यंत मतदान यादी फुगली आहे.म्हणून निवडणूकीत मतदानाची टक्केवारी कमी होते.तसेच घरोघरी जाऊन दिव्यांग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची माहिती घेणे व आपल्या यादीत तशी नोंद ठेवणे,गरूडा ॲपद्वारे सर्व मतदारांना आधार लिंक करणे याबाबत सविस्तर माहिती दिली.या बैठकीस अमळनेर तहसिलदार मिलिंद कुमार वाघ,न. पा. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड उपस्थित होते.