ससून चे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांची नियमबाह्य बदली त्वरित रद्द करा.

इंडीयन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन सह विविध सामाजिक संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

जळगाव प्रतिनिधीं: दि.१३/०२/२०२३ रोजी जळगाव येथील इंडीयन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन व अन्य सामजिक संघटनांच्या वतीने पुणे येथील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांची शासनाने नियमबाह्य पद्धतीने बदली केल्याने ती त्वरित रद्द करावी,याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,पुणे येथील ससून रुग्णालय व बै जे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ विनायक काळे हे दि १३/०१/२३ पर्यंत नियमित आस्थापनेवर कार्यरत होते.या आस्थापनेवरील कार्यकाळात त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नसून सुरळीत कामकाज सुरू असताना शासनाने दि १३/०१/२३ रोजी अचानक बदली आदेश काढून त्यांना संचालक प्राध्यापक, महारष्ट्र मानसिक संस्था,पुणे या गैर संवीधानिक कनिष्ठ पदावर जातीय द्वेशा पोटी बदली केली.तसेच अधिष्ठाता व प्राध्यापक हे समकक्ष नसून प्राध्यापक पड हे तुलनेत कनिष्ठ आहे.शासनाने सबळ कारण नसतांना नऊ महिन्यात डॉ विनायक काळे यांची नियमबाह्य बदली केल्याने त्याचा समाजमनावर मोठा आघात झाला आहे.एक समाज प्रिय व्यक्तिमत्त्व ,अशी ओळख जन माणसात असल्याने डॉ काळेंच्या नियमबाह्य बदली विरोधात संतापाची लाट उसळली आहे.याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याने आज जलगावं मधील इंडीयन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन सह भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ(ट्रेड युनियन) आदी सामाजिक संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शासनाला निवेदन द्वारे विंनती वजा इशारा देताना सांगितले की या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून आणि डॉ. विनायक काळे यांची नियमबाह्य,
बेकायदेशीर आणि अन्यायकारक झालेली बदली रद्द करून त्यांना पूर्व पदावर पुनर्स्थापित न केल्यास, तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द न केल्यास आणि सामाजिक व जातीय द्वेषातून केलेला हा
अन्याय दूर न केल्यास, तसेच शासनाचे बहूजन समाजातील कर्मचारी व अधिकारी यांचेवर सामाजिक व जातीय
द्वेषभावनेतून अशाप्रकारचा अन्याय करण्याचे धोरण न थांबविल्यास या विरोधात समस्त बहुजन समाजातील विविध सामाजिक, कर्मचारी कामगार संघटनांच्या माध्यमातून संवैधानिक आणि सनदशीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चरणबद्ध (धरणे, मोर्चे रॅली, बंद असे) अत्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आणि संबंधित सक्षम अधिकारी यांची राहील,अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी इंडीयन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन चे डॉ शाकीर शेख, प्रोटांन चे जिल्हा संयोजक किशोर नरवाडे, आनंद जाधव, राष्ट्रीय किसान मोर्चा चे प्रा शिवाजी पाटील,भारत मुक्ती मोर्चा चे नितीन गाढे,बहुजन मुक्ती पार्टीचे राजुभाऊ खरे, भगवान कांबळे संजय कदम संजय कदम शैलेश नन्नवरे किसन सूर्यवंशी विष्णू वानखेडे संजय राजपूत विलास चिकणे, आरबी परदेसी अरुण मस्के विनोद अडकमल आदी सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.