वंचित बहुजन आघाडीची अंमळनेर शहर जम्बो कार्यकारणी स्थापन..
अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहराच्या संपूर्ण प्रभागातून वंचित, दुर्लक्षित ,सेवाभावी, बहुजन समाजातील एस सी, एस टी, बी सी, एम बी सी ओबीसी, मराठा, विविध बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र करून सर्व समावेशक कार्यकारणी स्थापन झाली. त्या कार्यकारणीला महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांची मान्यता मिळाली असून, त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच शहर अध्यक्ष संदीप बबनराव सैंदाणे यांना मिळाले आहे. शहर उपाध्यक्ष ,शहर सचिव, महासचिव, संघटक, प्रचार प्रसार प्रमुख, आणि कार्यकारणी सदस्य. अशा विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्ती झालेल्या आहेत. कार्यकारणीतील शहर महासचिव अमजद खान हुसेन खान पठाण शहर उपाध्यक्ष हिरालाल गंगाराम वाघ उपाध्यक्ष हेमंत कुमार दगडू चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत प्रल्हाद कापसे, उपाध्यक्ष गजानन युवराज पाटील, संपर्कप्रमुख विनायक आप्पा डिवरे ,प्रसिद्धी प्रमुख सुनील काशिनाथ पवार , शहर संघटक मधुकर यशवंत पाटील ,सल्लागार आणि मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत मुरलीधर नेतकर, कार्यकारणी सदस्य किशोर पूनमचंद निकम, देवा विनायक पाटील, भाईसाहेब दगडू खाटीक ,सुनील विक्रम सैंदाणे ,इकबाल रसूल पिंजारी, किरण भाई साळवे ,भटेश्वर पाटील, सुरेश सिताराम सोनवणे, शरद बी पवार. इत्यादींच्या नियुक्ती त्यांना मान्यता मिळाली आहे अमळनेर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,विकासात्मक दृष्टिकोनातून सदर कार्यकारणीची कार्य सुरू राहील असे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संदीप बबनराव सैंदाणे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे.