जळगाव ; अमळनेर, (योगेश पाने)- महाविद्यालयात शैक्षणिक अध्ययन करीत असतानाच युवकांमधील कलागुणांचा विकास व्हावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा सामाजिक सहभाग वाढवा , शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांच्यातील सुप्त अशा व्यक्तीगत कलागुणांचा विकास व्हावा. याकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दरवर्षाप्रमाणे आपल्या परिक्षेत्रात असणाऱ्या महाविद्यालयातील प्रतिभावंत कलावंतांसाठी आपला 22 वा युवारंग महोत्सव येत्या 9 फेब्रुवारीपासून फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित केला आहे. या आधी हा महोत्सव 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार होता, आता या कार्यक्रमाच्या तारखेत बदल करण्यात आला असून 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विशेष संकल्पनेवर हा महोत्सव आयोजित केला आहे. अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्राध्यापक सुनील कुलकर्णी यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.