प्रताप  महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. विनोद बी. व्यवहारे सरांचे वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखदनिधन

दुःखद बातमी
अमळनेर – प्रताप  महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. विनोद बाळू व्यवहारे सरांचे वयाच्या ७७ व्या वर्षी आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पुणे येथे दुःखद निधन झाले. प्रा. व्यवहारे मूळचे बुलढाण्याचे निवासी होते. ते प्रताप कॉलेजमध्ये कनिष्ठ विभागात वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. सर ज्युनियर कॉलेजला असतानाही पीएच.डी. होते. सर विद्यार्थीप्रिय व व्यासंगी शिक्षक होते. सेवेत असताना त्यांनी महाविद्यालयाची सेवा अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे केली. नावाप्रमाणेच ते व्यवहारातही प्रामाणिक व चोख होते. काही काळ ते महाविद्यालयात कनिष्ठ विभागात उपप्राचार्य होते. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा. डॉ. सौ. विशाखा व्यवहारे आपल्या कॉलेजमध्ये वरिष्ठ विभागात मराठी विषयाच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख होत्या. कोविड महामारीच्या काळात त्यांच्या मोठ्या जावयांचे दुःखद निधन झाल्यामुळे ते खचले होते. सरांच्या मागे त्यांच्या २ मुली स्नेहल व सौ.हर्षल आणि मुलगा प्रेषित व पत्नी आहेत. मॅडम सेवानिवृत्त झाल्यानंतर सर पुण्याला स्थलांतरित झाले. त्यांचा मुलगा प्रेषित दिव्यांग असल्याने त्याची काळजी घेण्याच्या उद्देशानेच सर आपल्या लहान मुलीकडे पुण्याला स्थायिक झाले. सरांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. परमेश्वर त्यांना सरांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. मी व माझे कुटुंब त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना. ही भावपूर्ण श्रद्धांजली.
सरांची अंत्ययात्रा पुणे येथे उद्या सकाळी ९.३०वाजता होणार आहे, असे प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांनी कळविले आहे. परमेश्वर त्यांच्या परिवाराला हे दु:ख पचविण्याचे सामर्थ्य देवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना…..ओम शांति शांति शांति||

[democracy id="1"]