शरद पवार साहेबांचा शब्द खरा ठरवण्याची आली आता वेळ
नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून धोका, परत लोणी खावाले तयार शे बोका –
अमळनेर : निष्ठावंत आणि भूमिपुत्र म्हणून अमळनेरच्या जनतेने निवडून दिलेल्या आमदार पाटील यांनी पक्षाशी गद्दारी करीत महायुतीत सहभागी हाऊन पक्षासह जनतेला धोका दिला. जो पक्ष आणि नेत्याला राजकीय स्वार्थासाठी धोका देऊ शकतो तो सर्वसामान्य जनतेला केव्हा धोका देईल याचा नेम नाही. आपल्या स्वार्थासाठी लोण्याच्या गोळ्यावर लक्ष ठेवणाऱ्या या बोक्याला त्याची जागा दाखण्याची आणि शरद पवार साहेबांचा शब्द खरा ठरवण्याची आता वेळ आली आहे, असा समाचार प्रविण पाठक(उर्फ बबली पाठक )यांनी घेत अनिल पाटील यांच्यावर घणाघात केला.
गेल्या पंच वार्षिक निवडणुकीत भूमिपुत्र म्हणून अमळनेरच्या जनतेने अनिल पाटील यांना डोक्यावर घेतले आणि नंद पुत्राला घरी बसवले. त्याच अनिल पाटलाने निवडून आल्यावर अनैतिकचा खेळ सुरू केला आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या समीकरणात अजित पवार यांनी भाजपशी घरोबा करून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी आजही महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. वयाच्या ८० वर्षावरील शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत भर पावसात सभा घेऊन आमदार निवडून आले. अमळनेर मतदार संघात दोन वेळा आपटी खाणारे अनिल पाटील ही निवडून आले. पान त्यांनी अजित पवारांना साथ देऊन नॉट रिचेबल राहिले. अमळनेरचा आमदार हरवला अशी परिस्थिती झाली होते. हे बंड शरद पवार साहेबांनी मोडून काढले. पण गद्दारी करण्याची सवय असल्याने पुन्हा अजित पवार यांनी भाजपशी अभद्र युती केल्याने खोक्याच्या लालसेने गद्दारी करुन अनिल पाटील पुन्हा त्यांच्या सोबत गेले आणि मंत्रिपद पदरात पाडून घेत ‘स्वतःचे पुनर्वसन’ करून जनतेच्या भावनांना विस्थापित केले. मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे आणि टक्केवारीचे दुकानही थाटले. स्वतः ठेकेदार असल्याने कुठून किती आणि कशी टक्केवारी घायची यात ते माहीर आहेत. यातून जमवलेल्या मायेतुनच आता ते निवडणूक लढवत आहे. पण जो आपल्या पक्षाला आणि नेत्याला धोका देऊ शकतो तो तुम्हा आम्हाला धोका देणार नाही हे कशावरून असा प्रश्न उपस्थित होत आहे.निवडणूक आली की जात दिसते, नातेवाईक दिसतात पण ५ वर्ष मतदारांना गर्विष्ठ, अहंकारी भाषा वापरुन अपमानित करणाऱ्या आणि भूमिशी गद्दारी करणाऱ्या मंत्री ला जनताच जागा धाकविणार…
अभी नहीं तो कभी नहीं
सत्ता धारी शासनबाबत राज्यात नाराजी आहे. त्यामुळे टक्केखोर आणि गुंडगिरी वाल्यांना निवडून आपले अनमोल मत फुकट वाया घालू नका. अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हेच मतदार संघाच्या विकासाला दिशा देऊ शकतात. स्वच्छ आणि पारदर्शी व्यक्तिमत्व, निष्कलंक छबी असल्याने त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करून द्या, असे आवाहन प्रविण पाठक यांनी केले आहे.
‘गद्दारी’ का डाग अच्छा नहीं हैं !
आमदार अनिल पाटील यांच्यावर गद्दारीचा डाग आहे. त्यांनी कोणतेही डिटर्जंट पावडर आणले तरी ते धुतले जाणार नाही. कारण हा डाग कपड्यांवर नसून मतदारांच्या भावनांना ठेच पोहचवणार आहे. म्हणून ‘गद्दारी’ का डाग अच्छा नहीं हैं ! असे जनता बोलू लागली आहे.