प्रचारा दरम्यान गावोगावी अनिल दादा पाटील यांना वाढता प्रतिसाद… हिरालाल पाटील                            

औक्षण करतांना मतदार भगिनी….

अमळनेर  पाच वर्षात पातोंडा दहिवद जिल्हा परिषदेच्या गटात शाश्वत असा विकास मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केल्याने या गटात विकासाची भूख भागविणारा आमदार म्हणून जनतेत त्यांची ओळख निर्माण झाली असल्याची भावना भाजपा चे तालुकाध्यक्ष तथा दहिवद खुर्द गावाचे माजी सरपंच हिरालाल पाटील यांनी दिली.
यासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधताना हिरालाल पाटील म्हणाले की या गटातील जनता महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या सोबत आहेच परंतु त्यांच्या काळात गेल्या काही वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक विकास झाल्याने या विकासाचे देखील आम्ही समर्थन करीत आहोत.
या गटातून मतदानरुपी झालेल्या या प्रेमाची परतफेड अनिल दादांनी या गटात विकास कामांचा प्रचंड वर्षाव करून केली आहे.येथील लोक असं म्हणतात की स्वातंत्र्य काळानंतर गेल्या पाच वर्षात या गटात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.या गटात अनिल दादांनी जलजिवन मिशन अंतर्गत अनेक गावात कोट्यावधी निधी देऊन नवीन पाणीपुरवठा योजना दिल्याने ही गावे टंचाई मुक्त होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे ही अनमोल अशी भेटच आहे.या गटातील मुख्य मार्ग म्हणजे जलगावं,धरणगाव, म्हस्ले,टा करखेडा,अमळनेर मार्ग,हा रस्ता त्यांनी नूतनकरण करून दिल्याने शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसयास चालना मिळून दळणवळनास गती मिळाली.या गटात दहिवद,पातोंडा आणि अमळगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे,एकट्या दहिवद गावात तब्बल साडे पाच कोटींची विकासकामे अनिल दादांनी दिली आहेत.यातून रस्ता काँक्रीटीकरणं,बौद्ध विहार,गाव दरवाजा व सुशोभीकरण सारखी कामे झालीत.पातोंडा गावात सुमारे दोन कोटींच्या वर निधी दिल्याने यातून महिजी देवी देवस्थान साठी भक्तनिवास व स्वच्छता गृहे तसेच पाईप मोरी,गाव दरवाजा,शेत रस्ते,रस्ता काँक्रीटीकरणं,सामाजिक सभागृह उभारले गेले.नगावं खुर्द येथे सव्वा कोटी निधीतून 3 सिमेंट बंधारे टाकण्यात आल्याने शेतकरी राजासाठी पाणी अडविण्याची सोय झाली असून अजून तीन बंधाऱ्यांच्या निविदा प्रलंबित आहेत.अमळगाव येथेही भरघोस विकास कामे झाली आहेत. खरे पाहता या गटातील कोणत्याही गावाला निधीची कमतरता न भासू देता प्रत्येक लहान मोठ्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न अनिल दादांनी केला आहे.गांधलीत सव्वा कोटी,कंडारी गावासाठी 35 लक्ष,कामतवाडी 52 लक्ष, कुर्हे खुर्द 40 लक्ष आणि कुर्हे बुद्रुक येथे 80 लक्ष विशेष म्हणजे कुर्हे बु येथे चिखली नदीवर 64 लक्ष निधीतून बांधलेला सिमेंट बंधारा जीवनदायिनी ठरला आहे.या व्यतिरिक्त खेडी व व्यवहारदळे येथे 35 लक्ष,खवशीत 25 लक्ष,गडखांब व कचरे येथे 74 लक्ष,टाकरखेड्यात 67 लक्ष,दहिवद खुर्द 10 लक्ष,दापोरी 60 लक्ष,देवगाव देवळी 50 लक्ष,धुपी 15 लक्ष, नगाव 60 लक्ष, नगावं बु 20 लक्ष, निमझरी 65 लक्ष, पिंपळी प्र.ज.35 लक्ष, पिलोदा 65 लक्ष, मंजर्डी 25 लक्ष, म्हसले 25 लक्ष,रामेश्वर व रामेश्वर खुर्द येथे 82 लक्ष निधीतून इतर विकास कामे तर 62 लक्ष निधीतून सिमेंट बंधारा टाकण्यात आला आहे.याशिवाय लोणे येथे 15 लक्ष,सोंनखेडी 70 लक्ष यापद्धतीने गाव तेथे विकासकामे देऊन अनिल दादांनी सर्वच लहान मोठ्या गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच दिलेल्या निधीतून शेत रस्ता खडीकरण,स्मारक बांधकाम,सभामंडप,अंगणवाडी इमारत,भूमिगत गटार,गावात रस्ता काँक्रीटीकरण व खडीकरन,मोरी बांधकाम,चौक सुशोभीकरण, स्मशनभूमी बांधकाम,ग्रा प इमारत,अभ्यासिका,मंदिर सुशोभीकरण,गाव दरवाजा,आर ओ प्लांट,शाळा खोल्या दुरुस्ती,चौक सुशोभीकरण,सामाजिक सभागृह यासारखी कामे झाल्याने अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला असे स्वतः गावकरीच सांगत आहेत.त्यामुळे असा विकासाभिमुख आमदार भूमिपुत्राच्या रूपाने पुन्हा लाभणार असेल तर पुन्हा त्यांनाच आम्ही देऊ आणि पुढच्या पिढ्यांचे भविष्य उज्वल करू असे हिरालाल पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]