महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेतले; प्रचाराला सुरूवात

अमळनेर : विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी आज बहादरपूर येथील श्री. बद्रीनारायण महाराजाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला प्रारंभ केला.
यावेळी त्यांनी पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मतदारांशी संवाद साधत आपला प्रचार दौरा सुरू केला. डॉ. अनिल शिंदे यांनी या दौऱ्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचा अभाव, तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांचे सरकार राहील. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही.” अमळनेर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांना त्यांनी आग्रह केला की, “मला चांगल्या मतांनी निवडून द्या आणि सेवेची संधी द्या.”
त्यांचा प्रचार आज बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर, शेवगे, पुनगाव, आणि बोदर्डे या गावांमध्ये
महेश पाटील, जुबेर पठान , अज़हर सय्यद,गिरीश पाटील, दिनेश पवार, आशीष शिंदे,adv ललिता पाटील, चंद्रशेखर भावसार, पराग पाटील,डॉ बी एस पाटील, तिलोत्तमाताई पाटील, उमेश पाटील, रीता बाविस्कर,सुरेश पीरन पाटिल, धनकर आन्ना पाटील, सुभाष जिभाऊ पाटिल, नीलकंठ तात्या पाटील, प्रताप आबा पाटील,प्रा श्याम पवार, अरुण शिंदे सर,डॉ दिपाली शिंदे, डॉ मयुरी जोशी, उदय यशवंत पाटील, डॉ सिद्धार्थ पाटील,बालासाहेब पाटील, विजू मास्तर चौबारी, मयूर पाटील कविता पवार,
रोहन मोरे,डॉ प्रविण पाटीलसह
या प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते देखील उपस्थित होते.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन निश्चित आहे, याबद्दल श्रोतृकारांचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे. “जनता बोले परिवर्तन!” हेच जनतेचे वाक्य आता महत्त्वाचे ठरत आहे.

🌟 हाथ बदलेगा हालात..✋

डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये एकजुटीचे वातावरण निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]