एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही .योग्य ती कार्यवाही करून शासनास अहवाल सादर करू तहसीलदार रुपेश कुमार सुराणा
अमळनेर: तालुक्यातील जवखेडा व परिसरात दि. २६जून २०२४रोजी झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे काही शेतांमध्ये करण्यात आले. परंतु त्यांची नावे लाभार्थीच्या यादीत आले नाहीत व त्यांच्या व्यतिरित्त अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पंचनाम्यासाठी कृषी सहाय्यक किवा संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आले नसल्याच्या तक्रारी दि. ४ ऑक्टोम्बर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अमळनेर शहर अध्यक्ष श्याम पाटील यांना प्राप्त झाल्या असता त्यांनी तात्काळ ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील डॉक्टर अनिल शिंदे व कार्यकर्ते तसेच जवखेडा व परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेत अमळनेर येथील कृषी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले असता तहसीलदार रुपेश सुराणा यांनी कृषी कार्यालय गाठून शेतकऱ्यांना सांगितले की आम्ही येत्या दोन-तीन दिवसात पंचनामाचे याद्या मागवून अहवाल शासनास सादर करू व एकही शेतकरी लाभा पासून वंचित राहणार नाही याची आम्ही दखल घेऊ व शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासित करून ठिय्या आंदोलन उठविले.
यावेळी जवखेडा व परिसरातील वंचीत शेतकरी चंद्रकांत सीताराम गोसवी, विमलबाई भालेराव पाटील ,सुर्यभान सीताराम गोसावी, बाळू त्र्यंबक माळी, भास्कर दामू पाटील , आधिक हिलाल पाटील भाऊसाहेब आनंदा पाटील, रामदास आनंदा पाटील ,संजय यशवत पाटील ,नागराज संतोष पाटील ,जगन्नाथ ओकार पाटील,संगीता जगन्नाथ पाटील, निर्मला राजाराम न्हावी , कैलास राजेंद्र माळी ,रविंद्र राजाराम माळी उखर्डू रूपचंद पाटील ,सुनील लोटन पाटील रै.सुनिता सुनील पाटील,शिवाजी दंगल पाटील, याच्या व्यतिरिक्त देखील अनेक शेतकरी वंचित राहिलेले उपस्थित होते.