अमळनेर :पोलीस विभागातील प्रदीर्घ सेवेनंतर अमळनेरात अल्पावधीतच लोकाभिमुख अधिकारी म्हणून लौकिक मिळविलेले पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल नंदवाळकर हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्ताने त्यांची शहरातून सन्मानपूर्वक मिरवणूक काढण्यात येणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी दिलेल्या सेवेचा सन्मान म्हणून विविध सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्रांच्या वतीने त्यांची भव्य सन्मान
मिरवणूक सजवलेल्या बग्गी वरून मिरवणूकीचा शुभारंभ सोमवारी ३० सप्टेबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पैलाडपासून करण्यात येणार आहे. बोरी नदी पुलावरून सदर मिरवणूक शहरात प्रवेश करेल व मिरवणुक शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ढेकू रोड मार्गे कलागुरु जवळील पोलीस चौकीपर्यत काढण्यात येणार आहे. त्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात समारोप कार्यक्रम होईल. संयोजकांच्यावतीने बग्गीला सुंदर फुलांनी सजवले जाणार आहे.
पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांचे प्रशासनातील उत्कृष्ट कार्य आणि जनतेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन, हा सन्मान मिरवणूक सोहळा सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतकांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
सदर सन्मान मिरवणुकीत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर व्यक्ती तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
एका लोकाभिमुख पोलीस अधिकाऱ्याला सेवानिवृत्ती निमित्त देण्यात येणाऱ्या सन्मानाप्रसंगी उपस्थित राहून या ऐतिहासिक मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शहरवासीयांना
आयोजन समितीच्यावतीने केले आहे.