प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींचा निधी

वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरांचा समावेश-मंत्री अनिल पाटील

अमळनेर: महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील 13 धार्मिक स्थळांसाठी 3 कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरे व धार्मिक स्थळी विकास कामे होणार असल्याची माहिती नदीत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्या वतीने ही कामे होणार आहेत.विशेष करून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमळनेर येथील वर्णेश्वर महादेव मंदिरासाठी 50 लक्ष निधी मिळाल्याने हे संस्थांन पर्यटन दृष्ट्या विकसित होणार असून याशिवाय इतर मंदीरांवर सुशोभीकरण सभामंडप व इतर अनुषंगिक कामे होणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

येथे होणार विकासकामे

१)मौजे पाडसे, ता. अमळनेर येथील भवानी माता मंदिर चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 10 लाख,
२)मौजे झाडी, ता. अमळनेर येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 30 लाख,
३)मौजे दळवेल, ता. पारोळा येथील महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 25 लाख,
४)वनेश्वर महादेव मंदिर ता. अमळनेर जि. जळगांव पर्यटन दृष्टया विकसीत करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 50 लाख,
५)मौजे अंचलवाडी, ता. अमळनेर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे करणे, जि. जळगाव रक्कम 25 लाख,
६)मौजे बोदडे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील शनिमहाराज मंदीर चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 5 लाख,
७)मोजे गलवाडे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील म्हाळसादेवी मंदीर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 10 लाख,
८)मौजे निभोरा, ता.अमळनेर जि. जळगांव येथील राममंदीर येथे सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 10 लाख,
९)मौजे मठणगव्हाण, ता.अमळनेर जि. जळगांव येथील विठ्ठमंदीर येथे संरक्षण भिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 15 लाख,
१०)मौजे पिंपळे, ता.अमळनेर जि. जळगांव येथील नवनाथ व दत्तमंदीर येथे सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 20 लाख,
११)मौजे आटोळे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील भवानी मंदीर येथे चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 5 लाख,
१२)मौजे कावपिंप्री, ता. अमळनेर जि. जळगांव येथील लहरीबाबा सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 15 लाख,
१३)मौजे तळवाडे, ता. अमळनेर जि. जळगांव येथील धनदाई माता येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर अनुषंगक कामे रक्कम 10 लाख,
१४)मौजे जवखेडा, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील दत्त महाराज मंदिर येथे डोम सभामंडप बांधकाम करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 20 लाख,
१५)चक्रधर स्वामी महाराज मंदिर रणाईचे ता. अमळनेर जि. जळगांव येथे भक्तनिवास बांधकाम करणे व इतर अनुषंगिक बांधकाम रक्कम 40 लाख,
१६)मौजे ढेकू अंबासण ता. अमळनेर येथील श्रीराम मंदिर येथे चौक सुशोभिकरण करणे व इतर अनुषंगिक कामे रक्कम 10 लाख.
दरम्यान सदर निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,पर्यटन आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]