राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रताप महाविद्यायाच्या प्राचार्यांना निवेदन
अमळनेर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अंमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली असल्याने दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत द्या
या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रताप महाविद्यायाच्या प्राचार्यांना देण्यात आले.
शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2023 च्या नुसार राज्यातील 40 तालुके व काही महसूल मंडळामध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ घोषित करुन सवलती देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शालेय व महाविदयालयीन विदयाथ्यांचे परिक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. तरी आजपर्यंत प्रताप महाविदयालयातील विदयार्थ्यांचे परिक्षा शुल्क महाविदयालयाने सांगितलेल्या प्रक्रिया पुर्ण न केल्यामुळे मिळाले नव्हते.त्या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने प्राचार्यांशी चर्चा केली असता दोन ते तीन दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क वितरित करण्यात येईल असे आश्वासन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य ए बी जैन यांनी यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेला दिले.
यावेळी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष सनी गायकवाड
तालुकाध्यक्ष यशोदीप योगराज पाटील, शहराध्यक्ष कृष्णा बोरसे
शहर कार्याध्यक्ष मनिष देसले,
महाविद्यालय शाखाप्रमुख जनार्धन पाटील, शाखा चिटणीस कुणाल पाटील, शाखा उपाध्यक्षप्रशांत कंजर, शहर सरचिटणीस ऋषी पाटील,सरचिटणीस हुझाईफा पठाण,शहरसचिव प्रेम मोरे, उपसचिव चेतन बोरसे,शहर उपाध्यक्ष रोहित शिसोदे,सचिव कुणाल शिंगाणे, मयूर पाटील,हितिश नायडे,जयेश देवरे,जय महाजन, महेंद्र पाटील व ओम पाटील उपस्थित होते.