देशमुख नगर मधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक

अमळनेर:(अटकाव न्यूज) आग ओकणारा सूर्य घामाने निथळून निघणारे मानवी मन व प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा परिणामी देशमुख नगर मधील नागरिक हे नगरपालिकेला नियमित कर भरणारे नागरिक म्हणून ओळखले जातात अत्यंत संयमी आणि सहनशील असे नागरिक गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत अशातच 13 जून रोजी नऊ दिवसानंतर पाणी आले ते पाणी घराकडे न येता रस्त्याने सुसाट वाहू लागले त्याला कारणही तसेच भुयारी गटारींचा गलथान कारभार त्या कामावरील जेसीबीने पाईपलाईन फोडली मात्र घाबरून संबंधितांच्या लक्षात आणून दिले नाही त्यामुळे घरामध्ये पाण्याचा टिपूस ही नसताना गल्लीतून वाहणारे पाणी देशमुख नगरवासीयांच्या डोळ्याने पहावे लागले आणि मग मात्र संताप अनावर झाल्याने त्यांनी माजी नगरसेवक संदीप घोरपडे यांना घेराव घातला व माजी नगरसेवक श्याम पाटील यांना आमंत्रित करून आपली पाणी समस्या संबंधितांसमोर मांडली यावेळी अत्यंत अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती होती असे संदीप घोरपडे सर यांनी संबंधित नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी होणाऱ्या अडचणी लक्षात आणून दिल्या यात पाईपलाईन अंथरताना शक्यतो पाईपलाईनची लेव्हल चेक करून पाईपलाईन अंतरायला पाहिजे मात्र ठेकेदार जमिनीच्या लेव्हलनुसार पाईपलाईन अंथरतात आणि मग पाणी चढावाकडे योग्य रीतीने पोहोचत नसल्याने नागरिकांना समसमान पाणी वाटप होत नाही अनेकदा अनधिकृत कर्मचाऱ्यांकडून नवीन नळ जोडणी घर मालक करतात काही पैशाच्या आमिषाने असा अनधिकृत कामगार पाईपलाईनला वरून जोडणी देण्याऐवजी आडवा बोर मारून संबंधिताला जास्त पाणी देण्याचे अभिवचन देऊन त्यांचे कडून अवाच्या सव्वा पैसे उपटतात मात्र पाणी वाटपामध्ये येथूनच नियोजन कोलमडते यासह अनेक गोष्टी सांगताना संदीप घोरपडे यांनी सांगितले की या देशमुख नगर मधील पाईपलाईन 2003 4 या कालावधीमध्ये टाकलेली आहे ती कालबाह्य झाली आहे सोबतच त्याकाळी बांधलेल्या घरांची संख्या व सद्यस्थितीतील घराची संख्या यांच्यातही प्रचंड वाढ झालेली आहे काही ठिकाणी अपार्टमेंट उभे राहिले त्यांची देखील पाण्याची गरज जास्त आहे यामुळे उपस्थित सर्व देशमुख नगर नागरिकांनी जागेवरच नवीन पाईपलाईन टाकून मिळावी असा अर्ज केला तो अर्ज नगरपालिका इंजिनियर बैसाणे साहेब यांचे हाती नगरसेवक श्याम पाटील संदीप घोरपडे बाळासाहेब विंचुरकर गणेश पवार नरेंद्र साळी कैलास पाटील पवार साहेब सोनवणे साहेब अविनाश दास भाऊ यांच्यासह उपस्थित नागरिकांनी अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी नेरकर साहेब यांचेकडे लवकरात लवकर काम व्हावे म्हणून सुपूर्द केला हे पाईपलाईन लवकर टाकून न मिळाल्यास महिलांचा मूक मोर्चा नगरपालिकेवर धडकणार आहे अशी देखील माहिती देशमुख नगर वाशी यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]