अमळनेरच्या जिशान आणि जिया यांची प्रेते ८ रोजी शनिवारी सकाळी सापडली असून येत्या दोन ते तीन दिवसात अमळनेरला आणली जातील
अमळनेर : रशिया येथे एमबीबीएस च्या शिक्षणासाठी गेलेल्या अमळनेरच्या जिशान आणि जिया यांची प्रेते ८ रोजी शनिवारी सकाळी सापडली आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात ही प्रेते भारतात आणली जातील अशी माहिती राजदूत कुमार गौरव यांनी दिल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले.
निवडून आल्यानन्तर दिल्लीला आल्यावर अमळनेरची जिशान आणि जिया ही दोन विद्यार्थी तसेच भडगाव चा हर्षल नावाचा विद्यार्थी रशियात वोल्कोव्ह नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी बातमी कळली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी बोलणे झाल्यावर राजदूत कुमार गौरव यांच्याशी संपर्कात होते. शनिवारी सकाळी त्या दोघांचे शव आढळून आल्याचे कुमार गौरव यांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन आणि त्यांनतर शव ताब्यात देण्यासाठी व भारतात पाठवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. यासाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याने मंगळवार ते गुरुवार पर्यंत शव अमळनेरात येण्याची शक्यता आहे. घडलेली घटना अत्यन्त दुर्दैवी आहे. पिंजारी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी खासदार या नात्याने आणि भाजप ची प्रदेश उपाध्यक्ष नात्याने त्यांच्या दुःखात सहभागी आहे. शासकीय पातळीवर जी काही मदत लागेल त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. राजदूत कुमार गौरव आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संपर्कात आहे.