नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना दिली गती

अटकाव न्यूज, अमळनेर: येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नांना नगरपालिकेने प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे. मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना गती दिली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते, जर नाले साफ असतील तर पाण्याचा योग्य निचरा होत असतो. स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांच्या नियोजनाखाली काम सुरू करण्यात आले आहे. यात जेसिबीच्या सहाय्याने नालेसफाई श्यामराव करंदीकर, गौतम बि-हाडे,महेंद्र बि-हाडे, योगेश पवार सह विविध प्रभागांमध्ये राबवत आहेत. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी नगर पालिकेकडून घेतली जात आहे. तसेच प्रत्येक प्रभागात नाल्यांची पाहणी करून नाल्यातील कचरा साफ करण्यात येत आहे. कचरामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे पावसाळ्यात नाले भरून वाहणार नाही तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता नगरपालिकेने घेत आहे. तथापि मुख्याधिकारी, नगरपरिषद अंमळनेर मार्फत जाहीर आवाहन करण्यात आले आहे की नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा नदी, नाले इत्यादींमध्ये न टाकता तो नगरपालिका घंटागाडीतच टाकावा. जेणेकरून पुढील भविष्यात नाल्यांमध्ये कचरा साठून त्रास होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]