खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते अविनाश निकम यांना राज्यस्तरीय शिवछ्त्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे संगमनेर येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी: संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र ही संस्था गेल्या २०१९ पासून राज्य स्तरावर सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर सानप यांनी सामाजिक क्षेत्रात लोकांनी मोठ्या प्रमाणात कामगिरी करावी म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील अनेक लोकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळणे कामी दरवर्षी राज्य स्तरीय शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देत असतात.यावर्षी सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संगमनेर येथील मालपाणी स्पोर्ट क्लब येथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व ताईसाहेब जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी जळगांव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील भुमीपुत्र माजी उपसरपंच व उपशिक्षक श्री अविनाश वासंती आत्माराम निकम यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरी पाहता २०२४ चां शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांच्या सहचरणी प्रा वर्षा,मुलगा आरव,अर्ष,अरीन,बहिण प्रा डॉ सुजाता गाढे यांच्या सोबत सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे एकूण ५१ पुरस्कारथी सह कुटुंब राज्यभरातून उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी असलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपण सर्व आप आपल्या स्तरावरून समाजाची सेवा करून खऱ्या अर्थाने देश सेवा करीत असल्याने तुमचा सन्मान करणे गरजेचे आहे.या ठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील सर्व पुरस्काराथी यांच्या कामाची गाथा प्रकाशित केल्यास येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.याकार्यात माझा संपूर्ण सहभाग असेल.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनेक पुरस्कारथीनीं आपल्या क्षेत्रातील कामांची महती सांगितली.तदनंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर सानप यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन गोरक्ष भवर यांनी केले.
अविनाश निकम यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पुरस्कार मिळाल्याने शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरूड,भीमराव शेळके,प्रवीण गरूड,सचिव सागरमल जैन,उत्तमसिंग पाटील,दीपक गरूड,स्नेहदिप गरूड,मुख्याध्यापक एस के पाटील,एल एम पाटील आदी सह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रम यशस्विते साठी इंजी. गणेश सांगळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]