अमळनेरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे २५ रोजी आयोजन

मंगळग्रह सेवा संस्था व एचसीजी मानवता कॅन्सर सेन्टर, नाशिकचा संयुक्तिक उपक्रम

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था व नाशिक येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेन्टरच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी मंगळग्रह सेवा संस्था नेहमी कल्याणकारी व समाजाभिमुख उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांचे आजार, तोंडाचे रोग तसेच गर्भाशयाच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. शिवाय या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचाही लाभ मिळणार असून शिबिराच्या लाभासाठी अगोदर नाव नोंदणी आवश्यक आहे. शिबिराचे व नावनोंदणीचे ठिकाण अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर असून २४ फेब्रुवारी पर्यंत रोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत नावे नोंदणी करण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे. या शिबिरासाठी विशेष सहकार्य डॉ.एपीजे अब्दूल कलाम फाऊंडेशनच्या मनीषा चौधरी यांचे लाभले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]