डॉ. भूषण देशमुख रुग्णासाठी बनले देवदूत
अमळनेर : लेखानगर नासिक येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे लक्ष्मी धार्मिक या ५८ वर्षाच्या महिलेवर कॉड्रोसाक्रोमा या दुर्मिळ हाडांच्या कॅन्सरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या खुब्यापासून गुडघ्यापर्यंतचा कॅन्सरग्रस्त भाग पूर्णपणे काढून टाकण्यात आला व त्या जागी कृत्रिम खुबा बसविण्यात आला. ही शस्त्रक्रिया सहा तास चालली. नाशिकमध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. भूषण देशमुख यांनी केली. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी त्याचप्रमाणे डॉक्टर भूषण देशमुख यांनी व त्यांचे टीमने देवदूत बनून रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांकडून संपूर्ण डॉक्टर टिमचे अभिनंदन केले गेले .
अवघ्या काही तासांतच रुग्ण स्वतः चालू लागली. हॉस्पिटलला २१ वर्षें पूर्ण होत असल्यानिमित्ताने अत्याधुनिक कॅथ लॅब सुरू करीत असून हृदयरोग रुण्णांसाठी अजिओग्राफी, अंजिओप्लास्टी या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे डॉ. मराठे यांनी नमूद केले. डॉक्टर भूषण देशमुख हे मूळचे अमळनेर येथील प्राध्यापक श्री प्रवीण देशमुख सर व सौ रंजना देशमुख मॅडम यांचे चिरंजीव आहेत त्यांनी नाशिक मध्ये अनेक मोठमोठ्या शस्त्रक्रिया पार करून आपले नावलौकिक केलेले आहे