धरणाची सुप्रमा मिळविल्याने मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेरात जंगी स्वागत

अमळनेर-निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी 4,890 कोटींची सुप्रमा(सुधारित प्रशासकीय मान्यता)मिळविल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे अमळनेरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री मंडळाच्या बैठकित सुप्रमा मंजूर झाल्याची घोषणा झाल्यानंतर अमळनेरात मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्ते व हितचिंतकांनी फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता.त्यांनतर शनिवारी मंत्री पाटील यांचे नागपूर येथून अमळनेर येथे आगमन होताच पैलाड नाक्यावर असंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हितचिंतक व शेतकरी बांधवानी त्यांचे ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करून जंगी सत्कार केला त्यानंतर विश्राम गृह चौकात देखील तरुण कार्यकर्त्यांनी डी जे लावून त्यांचे स्वागत केले,त्यानंतर निवासस्थानी पोहोचल्यावर मंत्री पाटील यांना खांद्यावर घेत ठेका धरला, त्यांनीही कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून ठेका धरला.प्रचंड जयघोष यावेळी त्यांचा करण्यात आला.यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या धरणाच्या पूर्णत्वाला कुणीही रोखू शकणार नाही असा विश्वास देत लवकरच दिल्ली वारी करून पुढील प्रक्रिया देखील वेगात होणार असे आवर्जून सांगितले.
त्यानंतर अनेकांनी सत्काराचा वर्षाव मंत्री पाटील यांच्यावर केला धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यानीही समिती सदस्यांसह उपस्थिती देऊन मंत्र्यांचा सत्कार करत आभार मानले. सत्कारासाठी दिवसभर त्यांच्या घरी वर्दळ सुरूच होती.

अटकाव दिनदर्शिका 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]