देवगांव देवळी हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन
अमळनेर : देवगांव देवळी ता. अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये ६ डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी माल्यार्पण केले
इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. यात आठवीतील 14 मुलांनी इयत्ता नववीतील 8 मुलांनी तर इयत्ता दहावीतील 12 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला..
प्रथम- गायत्री रतिलाल भिल (इयत्ता दहावी),
द्वितीय-सोनाली महाजन, मयुरी महाजन, रागिणी पाटील,उन्नती गायकवाड, प्रियंका महाजन, तृतीय- श्वेता गौतम बैसाणे (इयत्ता दहावी) उत्तेजनार्थ- कृष्णा संजय पाटील शिवम रतिलाल भिल
(इयत्ता आठवी) सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षीस आय.आर.महाजन सय यांच्याकडून दिले जाणार आहेत. परीक्षक म्हणून एच.ओ. माळी यांनी काम पाहिले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले कि शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ”प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बरोबर त्यांच्या विचाराचे पूजन व्हावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट शिक्षक एस के महाजन ,एस ओ माळी, क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले..