अमळनेरमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा

अमळनेर: दि. 3 डिसेंबर 2023 – अमळनेर सकल मराठा समाजतर्फे आयोजित मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आज दि. 3 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता साने गुरुजी विद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीची व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे.

यासंदर्भात काल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी वाहतुकीची रूपरेषा सांगितली.

चोपडा, पारोळा, व धरणगाव रोड करून येणाऱ्यांची पार्किंग व्यवस्था विश्रामगृह व स्वामी समर्थ मंदिरामागे मोकळी जागेत व कचेरी जवळ करण्यात आली आहे.
धुळे रोड करून येणाऱ्या साठी पार्किंग व्यवस्था मार्केट कमिटी, सरजू शेठ यांची कॉम्प्लेक्स येथील जागा.
मारवाड गलवाडे कडून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था प्रमुख पेट्रोल पंपाजवळ, ग्लोबल शाळेजवळ करण्यात आली आहे.
ढेकु रोड, पिंपळे रोड, कडून येणाऱ्या साठी पार्किंग व्यवस्था नाट्यगृहासमोर करण्यात आली आहे.
नांदगाव, तांबेपुरा कडून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था खड्डाजीन इथे करण्यात आली आहे.
या सभेसाठी येणाऱ्यांना वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावे लागेल. तसेच, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागेल.

या सभेसाठी सूत्रसंचालन विक्रांत पाटील व आभार संजय पाटील यांनी केले. यावेळी मनोहर पाटील, विक्रांत पाटील,संजय पाटील,जयवंतराव पाटील,राजेंद्र देशमुख, हर्षल पाटील, प्रवीण देशमुख, जयेश पाटील,बाबू देशमुख आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]