स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर अमळनेर येथील भाजपा च्या एका बड्या नेत्याचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश हुकला.

भाजपचा एका बड्या नेत्याच्या राष्ट्रवादीत प्रवेश नाकारला

अमळनेर: एके काळी काँग्रेस आणि हल्ली भाजपा मध्ये असणारी भाजपा मधील एक मोठी व्यक्तीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये पक्ष प्रवेश मुंबई येथील कार्यालयात निश्चित करण्यात आला होता. सदर व्यक्ती सुमारे ४ ५ तास राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे तळ ठोकून होती आणि अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करीत होती. सदर बाब अमळनेर येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी लगबगीने प्रदेश पातळीवर संपर्क साधण्यास सुरुवात करत यांचा पक्ष प्रवेश झाल्यास आम्ही सर्व सामूहिक रित्या पक्षाचा राजीनामा देऊ असे सांगितले.
तदनंतर या भाजपा नेत्याने लागलीच राष्ट्रवादी कार्यालयातून काढता पाय घेतला असल्याचे समजले

तर संबंधित भाजप पदाधिकारी यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, ते त्या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त गेले होते. कोणत्याही प्रवेशाचा विषय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

[democracy id="1"]