ब्राम्हणे गावाच्या पोलिस पाटील पदी गणेश भामरे यांची निवड

अमळनेर तालुक्यातील बाम्हणे गावाच्या ” पोलिस पाटील ” पदी श्री. गणेश भामरे यांची निवड झाली आहे.

अमळनेर: महाराष्ट्र शासनातर्फे नुकतीच पोलिस पाटील भरती राबविण्यात आली त्यात बाम्हणें, ता.अमळनेर  पोलिस पाटील पदी श्री गणेश भाऊ भामरे  यांची वर्णी लागलेली आहे.


नुकतीच तालुक्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया पार पडली. ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आली. यात बाम्हणे गावात 11 उमेदवार पैकी गणेश भामरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी परिक्षेत लेखीत 80 पैकी 58 तर डॉक्युमेंट मध्ये 18 पैकी 11 तर तोंडी परिक्षेत 2 पैकी 2 असे एकूण 71 गुण मिळविले. ते पोलिस पाटील नियुक्तीस पात्र ठरले आहेत.

बाम्हणें, ता.अमळनेर  वाशीयांना मितभाषी, सुशिक्षित,संयमी असे व्यक्तिमत्व असलेले पोलिस पाटील श्री गणेश भाऊ भामरे यांच्या स्वरुपात प्राप्त झालेल आहे
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून स्वतःचा पायावर उभे राहून स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वकष्टाने उच्चशिक्षण घेवून त्यांनी आज पर्यंत स्वतःचा प्रवास केला, आज पर्यंत भूषवलेल्या प्रत्येक पदांला न्याय दिला, व आता सुद्धा पोलिस पाटील परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झाले आहे, या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.