महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हाध्यक्ष आदरणीय शरदजी कुलकर्णी यांचा सत्कार

दिनांक 12 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आयोजित सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळा व माननीय श्री वसंतरावजी मुंडे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास माननीय आमदार श्री श्रीकांत भारतीय विधान परिषद सदस्य माननीय धनंजय जी लांबे संपादक दैनिक पुढारी माननीय श्री चंदुलाल बियाणे संपादक दैनिक मराठवाडा साथी या मान्यवरांच्या साक्षीने जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष श्री शरद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस कुलकर्णी यांना शुभेच्छा देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्यासोबत महाड येथील अतिवृष्टीच्या वेळेस जळगाव वरून जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तूंचे दोन आयशर ट्रक भरून साहित्य पाठवण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला व जळगाव जिल्हा मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतो सदैव तयार असतो व जळगाव जिल्हा पत्रकारितेच्या माध्यमातून सदैव मदतीस तयार असतो आपणही तीच धुरा पुढे न्यावी अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून व्यक्त करण्यात आली यानंतर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण जी सपकाळे कार्याध्यक्ष दिगंबर जी महाले विभागीय अध्यक्ष किशोरजी राय साकडा विभागीय उपाध्यक्ष प्रमोदजी सपकाळे यांनी अभिनंदन केले।

[democracy id="1"]