अमळनेर: भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७६ व्या वर्षाचे औचित्य साधून येथील मंगळग्रह सेवा संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्री अर्थात १४ ऑगस्ट रोजी ७६ मशाली प्रज्वलित करून रँली काढली .भारतमाता की जय, वन्दे मातरम् आदी घोषणा देत मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या नेतृत्वात हातात तिरंगा व प्रज्वलित मशाली घेऊन श्री मंगळग्रह मंदिरापासून रँलीला प्रारंभ झाला.रॅलीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व व्हॉईस ऑफ इंडिया चे पदाधिकारी व सदस्यही होते.
बोरी नदीपुलावरून रँली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक पोहोचली. तेथे सेवेकरी गणेश सपकाळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले.त्यानंतर राणी लक्ष्मीबाई चौकात सेनादलातील निवृत्त जवान राजेंद्र यादव यांनी हुतात्मा स्मारकास, सुभाष चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास संस्थेचे सहसचिव दिलीप बहीरम यांनी तर साने गुरुजींच्या पुतळ्यास संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी माल्यार्पण केले. यावेळी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, जयश्री साबे, उज्ज्वला शहा , सुनीता कुलकर्णी,जितेंद्र जैन,प्रसाद शर्मा, अनिल रायसोनी,यांच्यासह सेवेकरी विनोद कदम, राहुल पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी,उमाकांत हिरे, प्राजक्ता पाटील
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खानदेश विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. विजय गाढे,तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार तसेच आरीफ भाया व मुस्लीम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.