अमळनेर : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर जि.जळगाव. दि.१५/०८/२०२३ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका प्रज्ञा पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चेअरमन मा.श्री.चंद्रकांत भदाणे सर यांनी भुषविले प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापीका जयश्री पाटील मॅडम व ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर यांच्या हस्ते ध्वजपुजन व ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर केले. त्या नंतर चेअरमन मा.श्री.चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनां खाऊवाटप करण्यात आला..कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक. खाटीक सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद पाटील सर, सचिन माळी सर, विजय चौधरी,विजय धनगर सर, सखाराम पावरा यांनी सहकार्य केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.