अमळनेर तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिष गोसावी यांना दिले निवेदन

अमळनेर: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविकांना आभा कार्ड तसेच आधार ईकेवायसीसह अन्य ऑनलाईन कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परंतु वरील कामासाठी लागणारी साधने(ॲंड्राईव्ह मोबाईल,डाटा रिचार्ज आदी) उपलब्ध करून दिलेली नाहीत म्हणून ऑनलाईन कामे करणे शक्य नाही.
आशा स्वयंसेविकांनी आपल्या सर्व्हे मधील नागरिकांची माहिती गोळा करुन ती वरिष्ठांना सादर करणे अपेक्षित आहे.
म्हणून वरील कामांसाठी लागणारी साधने आणि पुरेशा मोबाईल रिचार्ज खर्च मिळावा त्याशिवाय सदर कामांची सक्ती करून नये.अशा आशयाचे निवेदन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्षा सौ.सुनंदा पाटील यांच्यासह अमळनेर तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिष गोसावी यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

[democracy id="1"]