माजी जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ
अमळनेर-तालुक्यातील बोहरे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असताना या रस्त्याचे भाग्य आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी उजळले असून मारवड ते बोहरा रस्ता( 1600 मीटर) पर्यंत डांबरी करण करणे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने बोहरे ग्रामस्थ प्रचंड वैतागले होते, पावसाळ्यात तर प्रचंड हाल होत होते, ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी प्राधान्याने या रस्त्याला 50 लाख निधी मिळवून मंजुरी मिळवली असून लवकरच थेट बोहरे गावापर्यंत रस्त्यास मंजुरी व निधी मिळविण्याचे संकेत जयश्री पाटील यांनी दिले.
सदर रस्ता केल्याने बोहरे ग्रामस्थानी आमदारांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोहरा सरपंच दिपाली अहिरराव, सुधीर अहिरराव, अनिल बागुल,अनिल अहिरराव, केशवराव विंचूरकर, गोविंदराव विंचूरकर, संजय पाटील, उमाकांत पाटील, सचिन पाटील, आसाराम धनगर, जयकर पाटील, बापू मोरे, देवीदास भिल, स्वप्निल अहिरराव व ग्रामस्थ उपस्थित होते.